पंचायत समिती त्र्यंबकेश्वर

पंचायत समिती त्र्यंबकेश्वर, ई -मेल

nsktrambak@gmail.com

पंचायत समिती त्र्यंबकेश्वर, संपर्क क्रमांक

गट विकास अधिकारी: 881264490
सहायक गट विकास अधिकारी: 9423697629
पंचायत समिती: 02594-233812

संपूर्ण पत्ता -

त्र्यंबकेश्वर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र

कार्यालय वेळ स. १०:०० ते सायं. ०५:००

विविध योजना

प्रधानमंत्री / शबरी / रमाई/ मोदी/PM-JANMAN आवास घरकुल योजना पंचायत समिती, त्र्यंबकेश्वर 

 

अ.क्र.

कार्यक्रमाचे नाव

रमाई घरकुल योजना

1

लाभार्थी पात्रते संबंधी अटी व शर्ती

ग्रामसभे द्वारे मंजुरी देण्यात आलेले लाभार्थी ज्यांच्याकडे पक्के घर उपलब्ध नाही तसेच यापूर्वी कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

2

पात्रता ठरविणे साठी आवश्यक असलेली कार्यपद्धती

१) लाभार्थी अनुसूचित जातीचा असावा लाभार्थ्यांचे मासिक उत्पन्न १००००/- पेक्षा कमी असावे. ३) कुटुंबात यापूर्वी कोणासही लाभ मिळालेला नसावा. ४) लाभार्थ्यांस ग्रामपंचायतीने ग्रामसभेवर मंजुरी देण्यात यावी. ५ स्वतःचे मालकीची मिळकत असावी किंवा संमती पत्र दाखलकरण्यात यावे.

3

लाभ मिळविण्याची कार्यपद्धती

पात्र लाभार्थीना यांना त्यांच्या ग्रामपंचायतीस प्राप्त उद्दिष्ट्या प्रमाणे ग्रामपंचायत निहाय प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर प्राप्त झाल्या नंतर मा. सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग, नाशिक यांचेकडून प्रस्ताव तपासून लाभार्थी पात्र करण्यात येतो त्यानंतर मा. प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा, नाशिक यांचेकडून प्रशासकीय मंजुरी दिल्यानंतर लाभार्थ्यास रक्कम रुपये १7००००/- (अक्षरी रुपये एक लाख सत्तर हजार मात्र) तीन ते चार हप्त्या मध्ये पंचायत समिती कार्यालया मार्फत वाटप करण्यात येते.

4

कार्यक्रमा मध्ये विस्तृत माहिती मिळणाऱ्या लाभाची विस्तृत माहिती

रुपये १7००००/- (अक्षरी रुपये एक लाख सत्तर हजार मात्र) घरकुल बांधकाम करण्यासाठी शासनामार्फत अदा करण्यात येते. त्याच प्रमाणे प्रति दिन 31६ रुपये याप्रमाणे ९० दिवसांची मजुरी रुपये 28440/- अक्षरी रुपये आठठावीस हजार चारशे चाळीस मात्र) मजुरी शासनामार्फत अदा करण्यात येते

5

अनुदान वाटपाची कार्यपद्धती

प्रथम हप्ता अनुदान House Sanctioned.

व्दितीय हप्ता अनुदान Plinth Level.

तृतीय हप्ता अनुदान Lintal Level..

6

सक्षम अधिकाऱ्याचे पदनाम

चौथा हप्ता / अंतिम हप्ता अनुदान Completed

7

विनंती अर्जा सोबत लागणारे शुल्क

निशुल्क

8

कार्यपद्धती संदर्भात तक्रारी निवारणासाठी

गट विकास अधिकारी, पंचायत समिती त्र्यंबकेश्वर.

9

संबंधित अधिकाऱ्याचे पदनाम

गट विकास अधिकारी, पंचायत समिती त्र्यंबकेश्वर .

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोन्नती अभियान

अ.क्र.कार्यक्रमाचे नावअनुदाननियम व अटीकार्यपद्धती
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) राज्य शासन - ₹१५,०००
केंद्र शासन - ₹१५,०००
१. समूह किमान ३ महिने जुना असावा.

२. आवश्यक कागदपत्रे:
- गटाचे पासबुक
- आधार कार्ड
- वैयक्तिक पासबुक
- ई.आर.एफ. मूल्यांकन फॉर्म
गावातील कार्यरत ICRP मार्फत व प्रभाग समन्वयक समूहाचे मूल्यांकन करून प्रस्ताव तालुका कक्षाला मागणीसाठी सादर केला जातो. त्यानंतर जिल्हा कक्षावरून थेट समूहाच्या खात्यात निधी वर्ग केला जातो.
समूहांना कर्ज पुरवठाकिमान ₹१ लाख ते कमाल ₹२० लाखांपर्यंत आवश्यक कागदपत्रे:
१. कर्ज मागणी अर्ज
२. समूहाचे बँक पासबुक
३. आधार कार्ड
४. वैयक्तिक पासबुक
५. पासपोर्ट साईज फोटो
६. समूहाचा ग्रुप फोटो
७. समूहाचे लेखे
गावातील कार्यरत ICRP मार्फत व प्रभाग समन्वयक समूहाचे मूल्यांकन करून प्रस्ताव तालुका कक्षाला कर्ज मागणी सादर केला जातो. नंतर समूहाचे बँक कर्ज प्रस्ताव पोर्टलवर ऑनलाईन केले जातात. व त्यानंतर समूहाच्या ऐपतीनुसार बँक समूहाला कर्ज पुरवते.
समुदाय गुंतवणूक निधी (CIF)समुदाय गुंतवणूक निधी - ₹६०,०००सूक्ष्म गुंतवणूक आराखडा (MIP) ग्राम संघातून ६ महिने जुन्या समूहाचे सूक्ष्म गुंतवणूक आराखडा तयार केला जातो. संबंधित समूह ग्राम संघाकडे CIF निधी मागणी अर्ज करतो. ग्राम संघाची MIP उपसमिती मागणी प्रस्ताव तपासून ग्राम संघाच्या मासिक सभेत मान्यतेसाठी ठेवते. मान्यता मिळाल्यावर मागणी प्रभाग संघास सादर केली जाते. प्रभाग संघाच्या सभेत मंजुरी मिळाल्यावर मागणी तालुका अभियान कक्षाकडे सादर केली जाते. तालुका कक्षातून ऑनलाईन CIF मागणी जिल्हा कक्षाला सादर केली जाते. जिल्हा कक्ष प्रभाग संघाच्या बँक खात्यात निधी वर्ग करतो. त्यानंतर प्रभाग संघ ग्राम संघाच्या खात्यात, व ग्राम संघ समूहाच्या सदस्यांच्या खात्यात निधी वर्ग करतो.
  • पशुसंवर्धन विभागयोजना, पंचायत समिती, त्र्यंबकेश्वर
  1. योजनेचे नाव राज्यस्तरीय नाविन्य पूर्ण योजनेंतर्गत राज्यातील ग्रामीण भागात दुध उत्पादना सचालना देण्यासाठी दुधाळ देशी / दुधाळ संकरीत गायी/ म्हशींचे गट वाटप करणे
  • लाभार्थी प्राधान्य : महिला बचत गटातील लाभार्थी,अल्पभूधारक, सुशिक्षित बेरोजगार
  • लाभ: २ दुधाळ देशी / २ दुधाळ संकरीत गायी / २म्हशींचे गट वाटप करणे,सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थीना गटाच्या किंमतीच्या ५० टक्केआणिअनुसूचित जाती व जमातींच्या लाभार्थीना गटाच्या किंमतीच्या ७५ टक्के अनुदान,
  • गट किंमत: रु.७०,०००/- प्रती गाय, रु.८०,०००/-प्रती म्हैस २ दुधाळ देशी /२ दुधाळ संकरीत गायी- रु. १५६८५०/-२ म्हशींचा गट रु.१७९२५८/-

 

  1. योजनेचे नावराज्यस्तरीय नाविन्य पूर्ण योजनेंतर्गत अंशत: ठाणबद्ध पद्धतीने शेळी /मेंढी पालनाव्दारे शेतकयांना पूरक उत्पन्न मिळवून देणे.
  • योजना कालावधी :२०११ ते आजपर्यंत, २५.०५.२०२१ पासून सुधारित स्वरुपात
  • लाभार्थी प्राधान्य दारिद्र्य रेषेखालील, अत्यल्पभूधारक, अल्पभूधारक,सुशिक्षित बेरोजगार,महिला बचत गटातील लाभार्थी
  • लाभ १० शेळ्या/ मेंढ्या व १ बोकड/ नर मेंढायांचे गट वाटप, सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थीना गटाच्या किंमतीच्या ५० टक्के आणि अनुसूचित जाती व जमातींच्या लाभार्थीना गटाच्या किंमतीच्या ७५ टक्के अनुदान, उस्मानाबादी /संगमनेरी या जातीच्या शेळ्या व बोकड तसेच मडग्याळ किंवा दख्खनी मेंढ्या अथवा अन्य स्थानिक मेंढ्या गटांचे वाटप करण्यात येते.
  • गट किंमत:उस्मानाबादी/ संगमनेरी शेळी रु.१०३५४५/-,स्थानिक शेळी रु.७८२३१/-,मडग्याळ मेंढ्या रु.१२८८५०/-, दख्खनी व स्थानिक मेंढ्या रु.१०३५४५/-
  1. योजनेचे नाव१००० मांसल कुक्कुट पक्षी संगोपाना द्वारे कुक्कुट पालन व्यवसाय सुरु करणे
  • योजना कालावधी : २०१३ ते आजपर्यंत.
  • लाभार्थी प्राधान्य:अत्यल्प भूधारक, अल्पभूधारक,सुशिक्षितबेरोजगार, महिला बचत गट किंवा उपरोक्त तीन मधील वैयक्तिक महिला लाभार्थी
  • लाभ एकूण प्रकल्पाची किंमत रु. २,२५,०००/-, पक्षीगृह (१०००चौ.फूट) स्टोररूम,पाण्याची टाकी,निवासाची सोय,विद्युती करण इ.साठी एकूण किंमत रु. २,००,०००/-तर उपकरणे, खाद्याची /पाण्याची भांडी, ब्रुडर इ.बाबत रक्कम रु. २५,०००/- सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थीना गट किंमतीच्या ५० टक्के आणि अनुसूचित जाती व जमातींच्या लाभार्थीना प्रकल्प किंमतीच्या ७५टक्के अनुदान

 

  1. योजनेचे नाव: जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत अनु .जाती उपयोजना(विघयो)/आदिवासी उपयोजना/आदिवासि क्षेत्राबाहेरील उपयोजना अंतर्गत दुभत्यागाई /म्हशी गट वाटप करणे
  • योजना कालावधी : २०११ते आजपर्यंत, २७.०४.२०२३पासून सुधारती स्वरुपात
  • लाभार्थी प्राधान्य: दारिद्र्य रेषे खालील, अत्यल्पभूधारक, अल्पभूधारक,सुशिक्षित बेरोजगार महिला बचत गटातील लाभार्थी.
  • लाभ-२ दुधाळ देशी /२ दुधाळ संकरीत गायी / २म्हशींचे गट वाटप करणे, अनुसूचित जाती व जमातींच्या लाभार्थीना गटाच्या किंमतीच्या ७५टक्के अनुदान,
  • गट किंमत: रु.७०,०००/-प्रती गाय, रु.८०,०००/-प्रती म्हैस २ दुधाळ देशी /२ दुधाळ संकरीत गायी- रु. १५६८५०/- २म्हशींचा गट रु. १७९२५८/-
  1. योजनेचे नावजिल्हा वार्षिक योजने अंतर्गत अनु .जाती उपयोजना(विघयो)/आदिवासी उपयोजना/आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना अंतर्गत अंशतःठाणबंद पद्धतीने १०शेळी + बोकड / १०मेंढ्या + १नर मेंढा गट वाटप करणे.
  • योजना कालावधी :२०११ ते आजपर्यंत, २५.०५.२०२१ पासून सुधारित स्वरुपात
  • लाभार्थी प्राधान्य –दारिद्र्य रेषेखालील, अत्यल्पभूधारक, अल्पभूधारक, सुशिक्षित बेरोजगार,महिला बचत गटातील लाभार्थी
  • लाभ१० शेळ्या/मेंढ्या व १ बोकड / नर मेंढायांचे गट वाटप, अनुसूचित जाती व जमातींच्या लाभार्थीना गटाच्या किंमतीच्या ७५ टक्के अनुदान, उस्मानाबादी/संगमनेरी याजातीच्या शेळ्या व बोकड तसेच माडग्याळ किंवा दख्खनी मेंढ्या अथवा अन्य स्थानिक, स्थानीक यांचे गटांचे वाटप करण्यात येते.
  • गट किंमत: उस्मानाबादी / संगमनेरी शेळी रु.१०३५४५/- स्थानिक शेळी रु.७८२३१/-,माडग्याळ मेंढ्या रु.१२८८५०/-दख्खनी व स्थानिक मेंढ्या रु.१०३५४५/-

 

  1. योजनेचे नाव :जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजने अंतर्गत एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम: १०० एक दिवसीय पिल्ले वाटप.
  • योजना कालावधी: २०१०ते आजपर्यंत, २०.०१.२०२३पासून सुधारित स्वरुपात
  • लाभार्थी प्राधान्य– दारिद्र्य रेषेखालील, भूमिहीन शेतमजूर, मागासवर्गीय, अल्प वअत्यल्पभूधारक
  • लाभसर्वप्रवर्गांसाठी ५०% अनुदान, एक दिवसीय १००पिल्ले वाटप गट किंमत रु.२९,५००/-

 

  1. योजनेचे नाव : जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम: २५+ तलंग गट वाटप
  • योजना कालावधी: २०१० ते आजपर्यंत, २०.०१.२०२३ पासून सुधारित स्वरुपात
  • लाभार्थी प्राधान्य – दारिद्र्य रेषेखालील, भूमिहीन शेतमजूर, मागासवर्गीय, अल्प व अत्यल्प भूधारक
  • लाभसर्वप्रवर्गांसाठी ५०% अनुदान, २५ + ३तलंगा गट वाटप –गट किंमत रु.१०,८४०/-A
  • तालुका आरोग्य विभाग पंचायत समिती त्र्यंबकेश्वर आरोग्य विभागाशी संबंधित योजना :
  • कुटुंब नियोजन: या योजनेत, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर महिला आणि पुरुषांच्या टीएल शस्त्रक्रिया केल्या जातात. यामध्ये महिला लाभार्थ्यांना (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दारिद्र्यरेषेखालील) रु.६००/-, इतर सामान्य लाभार्थ्यांना रु.२५०/- आणि पुरुष लाभार्थ्यांना रु.१५००/- मानधन म्हणून दिले जाते.

 २)       आयुष्मान भारत: या योजनेअंतर्गत, आशा स्वयंसेविका मार्फत गाव पातळीवरील सर्व लोकांना आयुष्मान कार्ड दिले जातात. या योजनेअंतर्गत जर तुम्ही खाजगी रुग्णालयात उपचार घेतले तर तुम्हाला ५,००,०००/- रुपये दिले जातात आणि औषधोपचार आणि शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. ३)       मातृत्व अनुदान योजना: ही योजना आदिवासी भागात राबविली जाते, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दारिद्र्यरेषेखालील इतर श्रेणीतील गर्भवती मातांना रु. ४००/- मानधन दिले जाते. ४)       जननी सुरक्षा योजना: या योजनेअंतर्गत ज्या गर्भवती मातांची प्रसूती संस्थात्मक आहे त्यांना ७००/- रुपये आणि ज्यांची प्रसूती घरी आहे त्यांना ५००/- रुपये अनुदान दिले जाते.

अ.क्र.

नाविन्यपूर्ण संकल्पना

राबविलेले उपक्रम

टाकाऊ पासून टिकाऊ

THR च्या रिकाम्या गोन्यांपासून बालकाच्या नावाने स्वतंत्र पिशवी तयार करणे

बाहुली घर

सामाजिक भावनेचा विकास

बाल कोपरा

कमी वजनाच्या बालकांच्या वजनवाढी साठी प्रयत्न

स्तनपाना बाबत प्रशिक्षण

IIT चे प्रशिक्षण व्हिडीओ दाखून मार्गदर्श करणे

परसबाग

परसबागेद्वारे शेवगा भाजीपाला लाऊन पोषण आहारात वापर करणे

स्त्री जन्माचे स्वागत

स्त्री जन्म वृद्धीसाठी मुलगी जन्माला आलेल्या मातेचे स्वागत करणे,कौतुक करणे

आहार प्रशिक्षण

THR पासून आहाराचे प्रशिक्षण करून दाखविणे

पाक कृती प्रदर्शन

पाक कृती प्रदर्शनाद्वारे विविध रानभाज्यांचे महत्व पटऊन देणे

Scroll to Top